शनिवार, डिसेंबर ०३, २०११

गरज आहे...

"तो एक काळ होता,
राम आई साठी वनवासात गेला होता,
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे.....

फेसबुक वर मित्रांच्या स्टेटस वर १०० कमेंट्स देणाऱ्या आम्हाला
... ... घरातल्या आईला "कशी आहेस गं?"
हे विचारायला वेळ नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे.

मित्र मैत्रिणीचा वाढदिवस एक एक
महिना आधी लक्षात ठेवणाऱ्या आम्हाला
आई वडिलांच्या साध्या जन्मतारखा माहित नाहीत
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे.

गर्लफ्रेंड बरोबर एक तास एक मैल फिरणाऱ्या
आम्हाला आईने सांगितल्या वर
हाकेच्या अंतरावरून दळण आणायला वेळ नाही
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे.

ऑफिसमध्ये मित्रांच्या डब्यातले
खाऊन "आईला सांग मस्त झालीय भाजी"
अशी स्तुती करणाऱ्या आम्हाला
घरातल्या आईने केलेल्या पिठल्याची
स्तुती करायला आमच्याकडे वेळ नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे........

आजारी मैत्रिणीला हजारवेळा
हॉस्पिटल मध्ये भेटायला जाणाऱ्या
आम्हाला घरातल्या
बाबांना "आता कसे आहेत पाय तुमचे?"
ह्या पाच शब्दांसाठी वेळ नाही,
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे..."

"कोणती नाती कशी सांभाळायची हे तुमच्याच हातात आहे"

NISARG-NIYAM

एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्‍यावर खेळत होता.... त्याच्या तिरक्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता.. समुद्राच्या लाटा किनार्‍याला धडकत होत्या आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या... त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले

"आपण तर मित्र आहोत, मग सांग बरे तू असे का केले ?"
"मी मेहनतीने इतकी सुंदर नक्षी केली; तू मात्र क्षणात येवून ती पुसली...." हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली...मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली "तू मेहनतीने सुंदर नकाशी काढली... मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्‍यावर एक कोळी फिरत आहे काही तरी सावज मिळते का? हे शोधत आहे..
जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते... खरचं मला तुला दुखवायचे नव्हते रे ! मला तुला कायमचे गमवायचेही नव्हते.." हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली...क्षणाचाही वेळ न दडवता त्याने लाटेची माफी मागीतली ....यालाच कदाचित खरी मैत्री म्हणतात...

सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम करतात....नाही का ?

सुर्यकांत